महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा; मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हिडिओ वर सुषमा अंधारे यांची सडकून टीका
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यावर दबाव टाकत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मी मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नसल्याचे तानाजी सावंत या व्हिडिओत पोलिस अधीक्षकांशी बोलताना दिसत आहेत. मंत्री तानाजी सावंत यांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओत तानाजी सावंत हे पोलिस अधीक्षकांना आदेश देताना दिसून येत आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
तानाजी सावंत काय म्हणाले?
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना संवाद साधत आहेत. 'तुम्हाला एक पाठवलंय त्याबाबत तडजोड नाही. आता नंतरचे नंतर बघू. आज ऑर्डर काढा. आता चर्चा नाही. मी सांगतो ते करायचे, असे सांगत मी मुख्यमंत्र्यांचे देखील ऐकत नाही, असे मंत्री तानाजी सावंत या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
गृहखात्यावर वर्चस्वाचा प्रयत्न
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, गृह खात्याची अवस्था अशी झाली आहे की, कुणीही यावे आणि टपली मारुण जावे. त्यांत तानाजी सावंत यांची धाराशिव आणि सोलापूर भागातील कार्यपद्धती ही अरेरावेची आहे. हा व्हिडिओ बघताना मला वाटते की त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचे ते ऐकणार नसतील, तर तानाजी सावंत ऐकतील कुणाचे. मुख्यमंत्र्यांच जर आपल्याच मंत्र्यांवर वचक नसेल तर मुख्यमंत्री आम्हाला कायद्यांचे काय सांगणार. हे सर्व गंभीर आहे. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान त्यांच्याच पक्षातील मंत्री करत नसतील तर बाकी लोक त्यांचा सन्मान कसे करतील असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, तानाजी सावंत यांच्या व्हिडिओवरून दोन अर्थ ध्वनित होतात. एक तर गृहखाते ज्यांच्याकडे आहे अशी भाजपा आणि सत्तेतील शिंदे गट यांच्यामध्ये कुठलीही सुसूत्रता समन्वय नाही. तर दुसरा अर्थ मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांचा मंत्रिमंडळातील आपल्याच वाचाळ मंत्र्यांवर अजिबात वचक नाही हे ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा आहे.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List