बच्चू कडू यांचा मोठा आरोप:शरद पवारांनी तेव्हाच मराठा समाजाला ओबीसीत घेतले असते तर ही भानगडच राहिली नसती

बच्चू कडू यांचा मोठा आरोप:शरद पवारांनी तेव्हाच मराठा समाजाला ओबीसीत घेतले असते तर ही भानगडच राहिली नसती

शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतले असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले. जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसींमध्ये मराठ्यांना घेतले होते, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. कडू यांच्या दाव्यामुळे आता चर्चांना उधान आले आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.

दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा कोठा वाढवला पाहिजे. मराठा हा ओबीसीमधेच आहे. त्यांना त्याचा फायदा दिला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यापेक्षा आरक्षण कसे वाढेल हा विचार केला पाहिजे. आरक्षणाचा वणवा पेटला आहे. त्यात सर्वजण आपली किटली गरम करत आहेत. तो चहा समाजाला मिळणार नाही. हे लोक स्वत: पिणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

वडेट्टीवारांना आव्हान

बच्चू कडू म्हणाले की, मराठा हा कुणबी नाही तर कोण आहे हे वडेट्टीवार यांनी सांगावं. विदर्भातील मराठा कुणबी चालतो. मग मराठवाड्यातील का चालत नाही? 50 मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. ही अभिमानाची गोष्ट नाही. तुम्हाला ओबीसी नेते व्हायचं आहे तर व्हा. आणखी काही कार्यक्रम करायचा असेल तर करा. पण मराठ्यांच्या आरक्षणाच्या आड येऊ नका, असे सांगतानाच बोगस नोंदी होत आहेत, असा काही लोक आरोप करत आहे. पण ते तर सर्व हस्तलिखित आहे. बोगस नोंदीचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल त्यांनी केला.

ते ओबीसीच आहेत

24 तारखेपर्यत शिंदे समितीने अहवाल द्यायचा आहे. पुण्यात 75 टक्के नोंदी सापडल्या आहेत. ही मोठी गोष्ट आहे. कुणबींच्या नोंदी सापडत असल्याने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असं सांगतानाच मराठा म्हणून वेगळे आरक्षण मिळणार नाही. ते ओबीसीच आहेत, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PMWhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मराठी माणसाची गळचेपी आणि मराठी माणसांच्या दमनशाहीला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मराठमोळा भाग अशी...
​​​​​​​एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली : मुंबईहून दरे गावी पाठवले गेले डॉक्टर्स; केसरकरही न भेटताच परतले
“आज तुझा मर्डर फिक्स” ; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना उघड उघड धमकी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिमचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या कारवर हल्ला
सगळं सहन केलं…’; हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या.
चव्हाणांचे पैसे घ्या पण मत कॉंग्रेसला द्या; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका
प्रियांका गांधींच्या नागपूरमधील सभेत राडा; भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
Join Us on Whatsapp