चित्रा वाघ यांचा विचित्र दावा:म्हणाल्या, सरकारने दिलेल्या गोळ्या औषधी गरोदर माता घेत नसल्याने बालकांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या 24 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या राज्यात आरोग्य यंत्रणेतील गोंधळाचीच चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील या मृत्यू प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नासल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या संदर्भात चित्रा वाघ म्हणाल्या की, छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले त्या वेळी त्याचा व्हिडीओ देखील तयार केला. या मातांनी सांगितले की, जेव्हा सरकारच्या वतीने औषधी किंवा गोळ्या दिल्या जातात, पण त्या आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही.' असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. डॉक्टरांनी ज्या गोळ्या घ्यायला सांगितल्या त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदुरुस्त असते आणि तुमच्या मांडीवर खेळत असते, हे आम्ही त्यांना सांगितल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
सरकार पुरवू शकतो, गिळायला लावू शकत नाही
सरकार औषधी आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी या घटनेमागील कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेत नाही, याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List