विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाचा बलात्कार:पीडिता करत होती स्पर्धा परीक्षेची तयारी

विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाचा बलात्कार:पीडिता करत होती स्पर्धा परीक्षेची तयारी

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कारागृह पोलिसाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपी पोलिसाने पीडित तरुणीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यासाठी त्याने लग्नाचे खोटे आमिषही दाखवले होते. पण नोकरी लागल्यानंतर त्याने दुसऱ्याच एका तरुणीसोबत अफेअर सुरू केले. ही बाब लक्षात येताच पीडित तरुणीने सिडको पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

शुभम नरेश गोसटकर (रा. आडुळ, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. तो धुळे कारागृहात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओळखीचे प्रेमात झाले होते रुपांतर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी शहरात आली होती. 2020 मध्ये तिची ओळख स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या शुभम नरेश गोसटकर याच्यासोबत झाली. या ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. शुभम याने तरूणीला रूमवर जिवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन बोलावून घेतले. तिच्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यानंतर सदर तरूणीने तिच्यापासून विभक्त राहण्याचा प्रयत्न केला असता, शुभम गोसटकर याने तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखविले. 2020 ते सप्टेंबर 2023 या काळात त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

नोकरी लागल्यानंतर दुसरीशी सूत जुळले

या काळात शुभम गोसटकर धुळे कारागृह येथे पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागला. नोकरीनंतर सदर तरूणीला शुभम गोसटकर याचे अन्य तरूणीशी संबंध असल्याची माहिती मिळाली. याबाबत विचारणा केली असता, शुभम गोसटकर याने सदर तरूणीला बोलणेही टाळले. या प्रकरणात तरूणीच्या तक्रारीवरून शुभम गोसटकर याच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

IMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं; भाजपची सत्ता येताच मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मराठी माणसाची गळचेपी आणि मराठी माणसांच्या दमनशाहीला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मराठमोळा भाग अशी...
​​​​​​​एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली : मुंबईहून दरे गावी पाठवले गेले डॉक्टर्स; केसरकरही न भेटताच परतले
“आज तुझा मर्डर फिक्स” ; सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना उघड उघड धमकी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिमचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या कारवर हल्ला
सगळं सहन केलं…’; हर्षवर्धन जाधवांवर आरोप करत संजना जाधव भर सभेत रडल्या.
चव्हाणांचे पैसे घ्या पण मत कॉंग्रेसला द्या; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका
प्रियांका गांधींच्या नागपूरमधील सभेत राडा; भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
Join Us on Whatsapp