छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिमचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या कारवर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या गाडीत संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे होते. त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असून पोलिस त्याचा तपास करत आहेत. मतदानाला अवघा काहीच वेळ राहिला असताना ही घटना घडली आहे.
सिद्धांत शिरसाट हे घरी जात असताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हा हल्ला गाडीच्या मागून झाल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात सिद्धांत शिरसाट मात्र सुखरूप आहेत. या प्रकरणी संजय शिरसाट आता कुणाला लक्ष्य करतात हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात एका मतासाठी मतदाराला विशिष्ट रकमेचे वाटप करण्यात येत असल्याचा व्हीडीओ दानवे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे.
एका मतासाठी आधी एक हजार रुपये देऊन आधार आणि मतदान कार्डस जमा करून घेण्यात येत होती. मतदानाच्या दिवशी त्यांना बोटाला शाई लावून मतदान कार्ड आणि पाचशे रुपये घेऊन जायचे असा प्रकार असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवाहरनगर पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एका व्यक्तीकडून देवळाई तांडा येथे हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
संजय शिरसाटांनी आरोप फेटाळलेपराभव जवळ दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करत आहेत असे सांगत संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले आहेत.
संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीलाकालीचरण महाराजांनी मनोज जरांगेंना शिवीगाळ केल्यानंतर त्याच्या दुस-या दिवशी आमदार संजय शिरसाट हे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. कालीचरण महाराजांचा आणि आपला काही संंबंध नाही असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मतदानाच्या आधी ही भेट महत्त्वाची मानले जाते.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List