धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण : जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहनांची तोडफोड; तणावाची स्थिती
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा या प्रमुख मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या आंदोलनाचा हिंसक वळण लागले. तर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण
धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघाला. पण जस जसं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आलं तसे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अचानक जमावाने तोडफोड सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनेही फोडण्यात आली. त्यामुळ एकच गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली आहे. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
कार्यकर्ते गेटवर चढले
धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन आले होते. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आत शिरले. आत शिरताच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुर्च्या उचलून फेकल्या. वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे एकच तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते.
50 दिवसांची मुदत संपली, म्हणून मोर्चा
दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने चौंडी (जि.अहमदनगर) येथे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी शासनाने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने आज जालन्यात हा मोर्चा काढण्यात आला होत.
जिल्हाधिकाऱ्यांना देणार होते निवेदन
‘उठ धनगरा जागा हो.... आरक्षणाचा धागा हो’ हे ब्रीदवाक्य घेऊन मोर्चासाठी येणाऱ्या धनगर समाजातील नागरिकांनी सकाळी बारा वाजता गांधी चमन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर नियोजित मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न्याय्य हक्कांविषयी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. परंतू त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार होते.
आंदोलनांचे केंद्रबिंदू जालनाच कसे?
जालना जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून राज्यात चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे साधारण दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंतरवाली सराटी या गावात लाठीचार्ज करण्यात आला. यात गावातील लोकांना देखील पोलिसांनी मारहाण केली होती. परिणामी ग्रामस्थ देखील संतप्त झाल्याने त्यांनी पोलिसांवर देखील प्रतिहल्ला केल्याने हे गाव राज्यात चर्चेला आले. तर याचे पडसाद देखील राज्यभर पाहायला मिळाले. त्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. ही घटना थोडी विसरते की नाही, तोच आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली, वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जालनाच आंदोलनाचे व विशेषतः हिंसक आंदोलनाचे वळण का होऊ लागले आहे, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List